नव समाज निर्मितीस प्रतिबध्द
समाजातील नागरिकांत परस्परातील प्रेम, ऐक्य व सामंजस्य वाढावे, प्रत्येक प्रसंगी परस्परास साह्य करता यावे, शारीरिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक उन्नती करता यावी, तसेच मनोरंजन व ज्ञान प्रसार व्हावा, कला व क्रीडा याविषयी आवड उत्पन्न होऊन उत्तेजन मिळावे व त्यांचा योग्य प्रकारे प्रसार व्हावा, या गोष्टी साध्य करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा प्राप्त करून द्याव्यात, हे फौंडेशनचे उद्देश असतील. हे उद्देश साध्य करण्यासाठी फौंडेशन खालील गोष्टी करील :-
लोकजागृतीच्या उद्देशाने व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग, कार्यशाळा, शिबिरे आयोजित करणे, ग्रंथालये व वाचनालये स्थापन करणे व शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्यास उत्तेजन देणे. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे समाजातील होतकरू व इच्छुक तरुणांना व्यावसायिक व औद्योगिक मार्गदर्शन मिळण्याच्या संधी व सुविधा उपलब्ध करून देणे. क्रीेडा स्पर्धा भरविणे, खेळांना प्रोत्साहन देणे. कायदा व आरोग्यविषयक मदतीची व्यवस्था करणे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे. कलांना व उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नाट्य, संगीत व इतर कलाविषयक स्पर्धा आयोजित करणे. चित्रकला, शिल्पकला इ. ची प्रदर्शने भरविणे. साहित्यिक, कलाकार, शिक्षक, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योजक, संशोधक, तज्ज्ञ इ. व्यक्तींंची तसेच साहित्य, कला, शिक्षण, उद्योग, संशोधन इ. क्षेत्रात कार्य करणार्यास व्यक्तींचा सन्मान करणे व/वा त्यांना पुरस्कार देणे. वृद्धाश्रम व अनाथाश्रम यांना आर्थिक साह्य करणे. पर्यावरण विषयक जनजागृती करणे. वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे. आधुनिक शेती विषयी माहिती साठी कार्यशाळा घेणे.